महेंद्रसिंह धोनी हा कॅप्टन cool म्हणून ओळखला जातो, तर हा इतिहासातील सर्वात श्रेष्ठ कॅप्टन सुद्धा मानाला जातो. धोनी ने किमान 4 वेळा आयपीएल विजयी केलंय. पण आता या कारणामुळे धोनीने आयपीएल मधून माघार घेण्याचे ठरवले असे सोशल मीडिया वर सांगितले जात आहे.
टाटा आयपीएल 16 ची सुरुवात झाली आहे आणि यामध्ये सर्वात पहिली मॅच ही CSK vs GT यांच्यामध्ये होती, तर या मॅच मध्ये महेंद्रसिंह धोनी यांची टीम हरली आहे. तर बहुतांश लोक हे मॅच धोनिमुळे हरले असे सांगत आहे. परंतु धोनी यांच्या नेतृत्वाखाली मॅच एकदम काट्याची झाल्याचे दिसून येत होते.
नक्की काय झालंय
या मॅच मध्ये माही ला कीपरिंग करताना दुखापत झाली आहे त्यामुळे कॅप्टन कूल आता आपल्याला csk मध्ये दिसणार की नाही हा सगळ्यांचा प्रश्न आहे, या झालेल्या दुखापतीमुळे धोनी काही दिवस रेस्ट घेणार असे सोशल मीडिया वर रंगले आहे. तर दुखापत झाल्यावर सुद्धा धोनी आपल्याला खेळताना दिसला आहे.
महेंद्रसिंग धोनी यांच्या द्वारे आयपीएल न खेळण्याची कोणतीही घोषणा समोर आली नाही आहे त्यामुळे ही फकत एक अफवा आहे असे सांगण्यात येत आहे. धोनी आपल्याला येणाऱ्या सगळ्या आयपीएल मॅच मध्ये CSK टीम चां कॅप्टन म्हणून दिसणार आहे.
चेन्नई सुपर किंग यशस्वी टीम
चेन्नई सुपर किंग ही टीम अतिशय जास्त यशस्वी आयपीएल टीम आहे जी आता चार वेळा आयपीएल टुर्नामेंट जिंकली आहे. त्यात 2 वर्षे या टीम ला फिक्सिंग मुळे ban करण्यात आले होते. तरीसुद्धा csk द्वारा 4 वेळा आयपीएल cup जिंकला गेला आहे.
कॅप्टन कूल यशस्वी कर्णधार
महेंद्रसिंह धोनी हा भारताचा नव्हे तर आयपीएल चां सुद्धा कॅप्टन cool मानला जातो, कारण यांच्यामुळेच चेन्नई सुपर किंग 4 वेळा आयपीएल विजयी ठरली आहे. तसेच महेंद्रसिंह यांच्या नेतृत्वाखाली अनेक प्लेअर्स आपल्या खेळामध्ये सुधारणा करत आहेत.
2010 पासून ते आतापर्यंत महेंद्रसिंग धोनी चेन्नई सुपर किंग चां कॅप्टन आहे. आता या वर्षी सुद्धा याच्या नेतृत्वाखाली ही टीम करू करणार आहे. आता csk या वर्षी आयपीएल जिंकेल का हा प्रश्न सगळ्यांच्या मनात आहे.
चेन्नई सुपर किंग टीम: महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, बेन स्टोक्स, अंबाती रायुडू, मोईन अली, रविंद्र जडेजा, शिवम दुबे, दीपक चहर, मिचेल सँटनर आणि राजवर्धन हंगरगेकर